पिंपरी (Pclive7.com):- लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार २३ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व लोकमान्य कॅन्सर अँड रिसर्च सेंटर चिंचवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या सूचनेनुसार, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार १८ वर्षा पुढील महिलांसाठी “माता सुरक्षित” या योजने अंतर्गत खास महिलांसाठी अल्प दरात (सवलतीच्या दरात) कॅन्सर तपासणी व जनरल तपासणी शिबिर चिंचवड विधानसभा महिला संघटक सौ. पल्लवी पांढरे यांनी सेक्टर नंबर २८ संजय काळे मैदानावरील कॉर्पोरेशन हॉल, राशिनकर दत्त मंदिरासमोर, प्राधिकरण येथे आयोजित केले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगलाताई कदम ह्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वर्षा जगताप, अपर्णाताई मिसाळ, सारिकाताई पवार, पुष्पाताई शेळके, मनिषाताई गटकळ, शीलाताई भोंडवे, निर्मलाताई माने, आशाताई शिंदे, अशाताई मराठे, मीराताई कुदळे, सीमाताई हिमने मेहेक इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे ह्यांनी केले, प्रास्ताविक महिला चिंचवड विधानसभा संघटक सौ.पल्लवी पांढरे यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. माझे आरोग्य माझी जबाबदारी अश्या आशयाचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटल चे डॉक्टर सुखदेव गोळे यांनी देखील आरोग्य तपासणीचे फायदे, काळाची गरजच आहे. या सोबत अनेक आरोग्य विशेष मार्गदर्शन केले. महिलांनी शिबिराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Tags: Mata Surakshitncppimpri chinchwad ncpSharad PawarSharad Pawar Birthdayपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमहिला तपासणी शिबिरमाता सुरक्षितशरद पवार वाढदिवस कार्यक्रम
























Join Our Whatsapp Group