पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्लू’वर औषधोपचार घेत असलेल्या चिंचवड येथील एका ६८ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. गेल्या अकरा महिन्यात तब्बल ६१ जणांचा बळी स्वाईन फ्लूने घेतला आहे.
चिंचवड येथील एका ६८ वर्षीय महिलेला ८ नोव्हेंबरला उपचारासाठी थेरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर आज (दि.१५) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या वर्षात महापालिकेच्या विविध रुग्णालयात १० लाख ३५ हजार २९१ रुग्णांनी तपासणी केलेली आहे. त्यामध्ये ४१३ रुग्णांना ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील ३५२ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, अजूनही १ रुग्ण रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’शी लढत आहेत. तर ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या थंडीमुळे पुन्हा स्वाईन फ्लू आपले डोकं वर काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.























Join Our Whatsapp Group