
महाराष्ट्रातील विविध समस्यांना वाच्या फोडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करावे. रणजित शिरोळे म्हणाले, पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा, कर्जत विधानसभा, पनवेल विधानसभा, उरण विधानसभा, व मावळ विधानसभा यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकद आहे. मनसैनिकांनी एक दिलाने एक जोमाने कामाला लागावे मनसेचा हक्काचा खासदार निवडून येईल.
बाबू वागस्कर म्हणाले, शिरूर मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. पुढील भवितव्य खूप चांगले आणि मोठे आहे. पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात चांगलं झालेला आहे, अजून जोमाने कामाला लागावे. शिरूर मतदार संघाची बांधणी चांगली करा शिरूर मतदार संघात खासदार हा मनसेचा झाला पाहिजे.

अजय शिंदे म्हणाले, भोसरी विधानसभा शिरूर मतदार संघासाठी निर्णायक आहे यासाठी शहरातील नागरिकांच्या ज्या समस्या असतील, त्याला वाच्या फोडण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे. शिरूर व मावळ लोकसभा संघाची बांधणी आढावा बैठक घेत असताना पिंपरी विधानसभा, भोसरी विधानसभा,व चिंचवड विधानसभा, या तिन्ही विधानसभा सुमारे तीनशे जणांचा पक्षप्रवेश करण्यात आला. ११ नव्याने शाखाध्यक्ष नेमण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, उप शहराध्यक्ष राजू सावळे, विशाल मानकरी, बाळा जाणवले, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरसे, मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष, हेमंत डांगे, अनिकेत प्रभू, महिला सेनेचे अध्यक्ष सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर , महावीर कर्णावर, सचिन शिंगाडे विनोद भंडारी, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, सुशांत साळवी, जयसिंग भाट, श्रद्धा देशमुख उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group