नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदवाटप समारंभ
पिंपरी (Pclive7.com):- संघटनेत काम करताना ‘एकमेकां सहाय्य करू’ हे धोरण प्रत्येकाने अंगीकारताना आपले १०० टक्के योगदान देणे गरजेचे आहे. कार्यकारिणी आणि कार्यकर्ता हे आपल्या संघटनेची दोन चाके आहेत. या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आपले ‘उद्दिष्ट’ साध्य करता येवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत जगातील बलशाली राष्ट्र म्हणून विकसित होत आहे. या राष्ट्रकार्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारीणीचा पदवाटप कार्यक्रम मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात बुधवारी झाला. यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा शहर सरचिटणीस शीतल शिंदे, शैला मोळक, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, नामदेव ढाके, मावळ विधानसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार हिंगे, शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, पक्षाची धोरणे, मूल्ये ही सर्वात आधी कार्यकारिणीमध्ये रुजविणे आवश्यक आहे. हीच मूल्ये शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी कार्यकारिणीवर असते. एकदा ही मूल्ये आणि धोरणे शेवटच्या मतदारापर्यंत पोचविली की, तो मतदार शेवटपर्यंत पक्षाशी जोडला जातो, असा मतदार जोडणे हेच सध्याच्या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगोडीकर यांनी, तर आभार अजय पाताडे यांनी मानले.

























Join Our Whatsapp Group