पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तीन बांधकाम व्यावसायिकांच्या बंगल्यात आणि कार्यालयात आयकर विभाग तैनात आहेत. सकाळी सहा वाजता पाच वाहनांमध्ये आयकर विभागाची पथकं शहरात दाखल झाली आहेत.

पिंपरीतील बांधकाम व्यावसायिक श्रीचंद आसवानी यांच्या बंगल्यात सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. आसवानी यांच्या बंगल्याबाहेर आयकर विभागाचे वाहन उभे असून अधिकारी आणि पोलीस बंगल्यात आहेत. आयकर विभागाकडून नेमकी काय कारवाई चालू आहे याबाबत अधिकृत माहिती मिळत नसून पिंपरीसह वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवर देखील आयकर विभागाने धाड टाकली असल्याची माहिती मिळत आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
























Join Our Whatsapp Group