जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक २०२४ याला पाठिंबा
पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणी नदी सातत्याने फेसाळत आहे. तिचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासकिय स्तरावर पावले उचलली जात आहेत. त्याला वेग येण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अशातच केंद्र सरकारने आणलेले जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 जल प्रदूषणाला आळा घालेल अशी आशा खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 या विधेयकाला खासदार श्रीरंग बारणे यांनी समर्थन दिले. यावेळी ते संसदेत बोलत होते. संसदेत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, विहीर, नदी, नाले यापासून समुद्रापर्यंत जल प्रदूषण झाले आहे. ही भीषण परिस्थिती अताचे सर्वात मोठे आव्हान आहे.