पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मधील बीएसएनएल मेन एक्सचेंज बिल्डिंग इथे एक भलेमोठे झाड आज (दि.०१) गाडीवर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या मारुती सुझुकी वॅगनर गाडीचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून सदर झाड हटविले आहे.
अग्निशमन विभागाला आज (दि.०१) सकाळी ११.४५ वाजता चिंचवड मधील बीएसएनएल मेन एक्सचेंज बिल्डिंग इथे एक भलेमोठे झाड कोसळले असल्याची माहिती सौ. कल्पना शरद पल्लेवार यांनी दिली. ही माहिती प्राप्त होताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी एम.एच.०४. डी जे. ९२६८, मारुती सुझुकी वॅगनर या गाडीवर झाड पडले होते.
प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्राचे, मुख्य अग्निशामक विमोचक संजय महाडिक यांनी इलेक्ट्रिक चेन सॉ ने हे झाड कट करून गाडी बाजूला केली. त्यांच्या मदतनीस अनिल माने (अग्निशामक विमोचक), शुभम पिंपळे (ट्रेनि सब ऑफिसर) आणि तेजस पवार (ट्रेनि फायरमन), सौरभ घोरपडे (ट्रेनि फायरमन) होते. हे मदतकार्य संपत गौंड (प्रमुख अग्निशामक विमोचक), यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात आले. या दुर्घटनेत कोणीही व्यक्ती जखमी झालेला नसून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

























Join Our Whatsapp Group