पिंपरी (Pclive7.com):- वाढदिवसानिमित् त लोक अनावश्यक खर्च करतात. परंतु सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. वाढदिवसावर होणारा अवाढव्य खर्च न करता समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत उद्या गुरूवार (दि.०२ मे) रोजी चक्क रुग्णवाहिका सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसासाठी सामाजिक भावनेतून स्तुत्य असा उपक्रम राबविला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरांमधील सर्व नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामधील सर्व रुग्णवाहिका गुरूवार दि.०२ मे २०२४ रोजी एक दिवसासाठी मोफत देण्यात येणार आहे. तरी सर्व गरजूंनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मारुती जाधव यांनी केले आहे.


























Join Our Whatsapp Group