चेन्नईनं काय म्हटलं ?
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाबाबत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. “एमएस धोनीन आयपीएल 2024 आधी संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली आहे. ऋतुराज गायकवाड 2019 पासून संघासोबत आहे. त्यानं आतापर्यंत 52 धावा खेळल्या आहेत.”
धोनी सर्वात यशस्वी कर्णधार
आगामी आयपीएल हंगामासाठी गुरुवारी सर्व 10 संघांच्या कर्णधारांचे एकत्र फोटोशूट झाले. यावेळी सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनी दिसणार, असा सर्वांचा समज होता. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच. धोनीच्या जागी सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. एमएस धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. 2019 मध्ये धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो आयपीएल खेळत आहे. मागील काही वर्षांपासून धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु आहे. यावेळीही धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलेय. तसे संकेतच फ्रँचायझीकडून गुरुवारी दिले गेले.