पुणे (Pclive7.com):- पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत. या पावसामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस पडत आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्यामुळे पावसाळी नाल्यांची सफाई झाली नसल्याच स्पष्ट झालं आहे. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची लक्तर या पावसानं काढली आहेत.