पिंपरी (Pclive7.com):- केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगर ब्रांचमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांचे स्वागत औक्षण करून व फुलांचा वर्षाव करून करण्यात आले.
केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगर ब्रांचमध्ये आज पासून शाळा सुरु झाली. शाळेचा पहिला दिवस म्हणून छोटे छोटे चिमुकले तयार होऊन आले होते. प्रत्येक चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कृष्णानगर ब्रांच ओनर सौ.कीर्ती मारुती जाधव व सर्व टीचर्सने शाळेमध्ये येणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत औक्षण करून व फुलांचा वर्षाव करून आनंदाचे वातावरण निर्माण करून केले होते. तसेच सोडायला आलेल्या सर्व पालकांचे स्वागत करून सौ. कीर्ती जाधव यांनी आभार व्यक्त केले.