पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात काल प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची आज (दि.१८) पुण्यात बैठक घेतली.

या बैठकीला आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, श्याम लांडे, शमीम पठाण, संतोष कोकणे, राजेंद्र जगताप, माया बारणे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, डब्बु आसवाणी, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, मनोज खानोलकर, उषा काळे, स्वाती काटे, कैलास बारणे, नारायण बहिरवडे, सतीश दरेकर, आशा सुर्यवंशी, सुजित पाटील, मंदा आल्हाट, रोहित काटे, राजू लोखंडे, महमद पानसरे, कळुराम पवार, अमिना पानसरे, वैशाली काळभोर, मंगला कदम, अपर्णा डोके, सुषमा तनपुरे, सारिका पवार, गोरक्ष लोखंडे, मायला खत्री, संदीप पवार, श्याम जगताप आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत विलास लांडे यांची उपस्थिती..
अजित गव्हाणे यांनी काल पत्रकारांना बोलताना माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. आमच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे असे सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने भोसरी विधानसभेत नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
काल शरद पवार गटात प्रवेश केलेल्या यादीतील माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, अनुराधा गोफणे, तानाजी खाडे आणि योगेश गवळी यांचे वडील पंडीत गवळी हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच भाजपचे समर्थक माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे हेही उपस्थित होते.