डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानची मागणी
आकुर्डी (Pclive7.com):- आकुर्डीत एकाच घरात डेंग्यूचे ५ रुग्ण आढळले असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाढत्या डेंग्यूच्या फैलावाला आवर घालण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

आकुर्डी येथील विवेकनगरमध्ये एका अपार्टमेंट मधील एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींना डेंग्यूची लग्न झाली आहे. या सर्व रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आकुर्डी भागात डेंग्यूची साथ वाढण्यापूर्वी तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानचे इखलास सय्यद आणि तौहिद जावेद शेख यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आकुर्डीत ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणी करावी. आजूबाजूच्या परिसरात कडक कंटेनर सर्व्हे करावा. तसेच संपूर्ण आकुर्डी भागात कंटेनर सर्व्हे राबवून डेंग्यूचे डास उत्पत्ती स्थळे शोधावीत आणि डेंग्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी असे या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान एकाच कुटुंबात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.





















Join Our Whatsapp Group