मावळ (Pclive7.com):- गेल्या २४ तासांपासून मावळ परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पवना धरण क्षेत्रात ८८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज (दि.१९) दुपारी ४ वाजेपर्यंत पवना धरणात ३७.८५ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.

यंदाच्या जून महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे १ जूनपासून आतापर्यंत पवना धरण क्षेत्रात एकूण ४४८ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात १४.५५ टक्के वाढ झाली असून, सध्या धरण ३७.८५ टक्के भरले आहे.

मावळातील या महत्वाच्या जलस्रोतातील साठ्यात होत असलेली ही वाढ मावळ तालुका व पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने आशादायक मानली जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला काहीसा उशीर असला, तरी मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे धरणांतील जलसाठा हळूहळू भरू लागला आहे.























Join Our Whatsapp Group