भोसरी (Pclive7.com):- मातंग समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा उद्या रविवार दि.११ रोजी संध्याकाळी ५ ते १० यावेळेत भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सौ. कीर्ती मारुती जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याप्रसंगी आमदार महेश लांडगे, नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे, जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल सौंदडे, मातंग समाजाचे नेते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अमित गोरखे, जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सौंदडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायक विशाल चव्हाण यांच्या गाण्यांचा कार्यक्रम देखील होणार आहे. तसेच मातंग समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण-तरुणींचा, कलाकार व नागरिकांचा उचित असा सन्मान केला जाणार आहे अशी माहिती मारुती जाधव यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group