रावेत (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव रविवारी आणि सोमवारी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन्ही दिवशी भगवंतांचे दर्शन सकाळी साडेसात वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अखंड दर्शन सुरू राहील व येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी शहरांमध्ये डेंगू मलेरिया यांसारखे रोग मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी दर्शनासोबत या मेडिकल कॅम्पमध्ये भाग घेऊन समाज कार्यामध्ये देखील योगदान देण्याचे आवाहन इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश गौरांग दास यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तिथीला सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम व महा अभिषेक आणि रात्री ठीक बारा वाजता महाआरती होईल या महाआरतीच्या विशेष तिथीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह , महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त राजेंद्र भारूड उपस्थित राहणार आहेत.























Join Our Whatsapp Group