आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर माउलींच्या अलंकापुरीत (आळंदी) संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सोमवारी (दि.२६) पहाटे माउलींच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला.

दुपारी १२ च्या सुमारास अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या गाथा-भजनाने सांगता करण्यात आली. संध्याकाळी हभप नामदेव महाराज शास्री यांचे सुश्राव्य किर्तन विणा मंडपात संपन्न झाले. तसेच रात्री १० ते १२ मोझे सरकार यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. त्याचवेळी विणा मंडपात आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने गावकरी भजन सेवा करण्यात आली.

दरम्यान रात्री बारा वाजता जन्मोत्सवावेळी भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी केली. तद्नंतर श्रींची आरती झाली. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या वतीने गोकूळ पूजा व मानकऱ्यांना नारळ, प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वेदांत चोपदार, बाळासाहेब चोपदार, ऋषीकेश आरफळकर, योगीराज कुर्हाडे, राहुल चिताळकर, योगेश आरु, स्वप्नील कुर्हाडे, हभप बापूसाहेब मोरे, मुखेकर शास्री महाराज, वेद महाराज लोंढे व बहुसंख्येने आळंदीकर ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group