वाकड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला राम वाकडकर युथ सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मंगळवारी (दि.२७) ऑगस्ट रोजी सायंकाळी वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे आयोजित करण्यात आला आहे. या भव्य दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मौनी रॉय ही या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असल्याची माहिती आयोजक राम वाकडकर यांनी दिली आहे.

या दहीहंडी उत्सवाला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राम वाकडकर युथ सोशल फाउंडेशनची दहीहंडी तरुण, तरुणींसह परिसरातील नागरिकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. या दहीहंडीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत असते. यंदाच्या वर्षी सिनेअभिनेत्री मौनी रॉय ही प्रमुख आकर्षण असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उत्सवाला हजेरी लावावी असे आवाहन राम वाकडकर यांनी केले आहे.



















Join Our Whatsapp Group