भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्त संकलन अभियाना अंतर्गत शिबिराचे आयोजन
चिंचवड (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये ‘रक्त संकलन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चिंचवड येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.

युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे आणि शहर सरचिटणीस शिवम डांगे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील गोखले हाॅल येथे ‘पिंपरी चिंचवड ब्लड बँक’ यांच्या माध्यमातून हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच युवकांसाठी स्वयंरोजगार, स्किल डेव्हलपमेंट, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सातत्याने मेळावे, शिबीर या सारख्या कार्यक्रमांचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रक्त संकलन अभियान’ संपूर्ण राज्यभर राबवून समाजिक बांधिलकीची जतन करण्याचे काम युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोरेश्वर शेडगे, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर प्रभारी बाळासाहेब घोटकुले, युवा मोर्चा प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य गणेश वाळुंजकर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, सचिव मधुकर बच्चे, विजय सिनकर, प्रभाग अध्यक्ष तथा माजी प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, पै. विजय गावडे, धनंजय शाळिग्राम, प्रदीप सायकर, नितीन भोगले, रविंद्र प्रभुणे, हरीश मोरे, दिपाली कलापुरे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस सतिश नागरगोजे, सनी बारणे, मोहन राऊत, सुधीर साळुंखे, राहुल खाडे, सचिन बंदी, मंडल अध्यक्ष सुमित घाटे, सोशल मिडिया संयोजक आदम मुलानी, शुभांगी कसबे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिबीराला उपस्थिती लावली.
अजित कदम, ऋषिकेश सुर्यवंशी, आदित्य रेवतकर, निमित सायकर, सारीष भेगडे, सर्वेश भेगडे, गजेंद्र जाट, मयुरेश गायकवाड, ऋषिकेष वाळुंज, सौरभ गावडे, मनव चौधरी यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
























Join Our Whatsapp Group