पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष (कार्याध्यक्ष)पदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नियुक्ती पत्राद्वारे शत्रुघ्न काटे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. संघटनात्मक पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष (कार्याध्यक्ष) पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दहा वर्ष नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून शत्रुघ्न काटे यांनी काम केलेले आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक दृष्टया वाटचाल करणार असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.