पिंपरी (Pclive7.com):- आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील? याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. दिव्यांग व्यक्तिंच्या शारिरीक कमतरतेची भरपाई मात्र, देवाने त्यांना मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ माणसाच्या बरोबरीचे आयुष्य जगू शकतात. गरज असते ती आपण त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि त्याच भावनेतून समाजातील अशा दिव्यांग बांधवांच्या जीवनात खरा आनंद निर्माण करण्याचे काम साद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करीत आलो आहोत, असे प्रतिपादन कामगार नेते आणि साद सोशल फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष इरफानभाई सय्यद यांनी केले.
दिवाळीत अंध बांधवांमध्ये प्रकाशवाटा पेरण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी साद सोशल फाऊंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे गुरुवारी (दि. ०९) रोजी आकुर्डीतील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, देवेंद्र चव्हाण, आमदार अमित गोरखे, व मान्यवर यांच्या हस्ते अंध कुटुंबिय आणि दिव्यांग बांधवाना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद, पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, जेष्ठ पत्रकार अनीलजी कातळे, भूषणशेठ नांदुरकर, अशोक लोखंडे, अमोल शिंत्रे, शबनम सय्यद, उद्योजक भगवानजी पोखरकर, संभाजी शिरसाठ,उद्योजक किसनशेठ बावकर,दिलीपशेठ सोलंकी, अरविंदशेठ सोलंकी, डॉ.किशोरजी उढाण, उद्योजक राजेशजी पांगल, सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे रमेश चौधरी, संजय सोलंकी, महेंद्र शेठ ठाकूर, सुशीलशेठ जैन, रोहीतशेठ अगरवाल, संदीपशेठ पटेल, अमोल म्हेत्रे, राजूशेठ पाटील, रॉकीशेठ अगरवाल, दीपकशेठ जाधव, सुरेंद्रशेठ अगरवाल जाधव, अशोकशेठ माने उद्योजक अतिश बारणे, मल्लेश काद्रापूरकर, डॉ. महेश शेटे, डॉ.प्रताप सोमवंशी, उद्योजक प्रभाकर गुरव, संजयजी बांदल, उर्से गावचे सरपंच प्रदीप धामणकर, दस्तगीर मणियार, जरीन ( लालू भाई ) शेख , रवीभाऊ घोडेकर, परेश मोरे, संतोष साळुंके, संदीप मधुरे, रवी माने, किशोर जैद, रोशन मोरे, कैलास मोरे,अनिल दळवी पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, हर्षद लुकंड, जितेंद्र सोनिगरा, अमित जैन सर्जेराव कचरे , गोरक्ष दुबाले, प्रशांत सपकाळ, जावेद आरकटे, चेतन चिंचवडे, आझादभाई मुलाणी व साद सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्य आणि सहकारी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छांसोबत दिवाळी फराळ भेट देण्यात आले.
आमदार अमितजी गोरखे म्हणाले की, दिवाळीची सुरुवात अशा दिव्यांग बांधवांच्या आशीर्वादाने होत आहे ही खूप सुंदर गोष्ट आहे. अंध बांधवांना अंधकारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी आणि दिशा दाखवण्यासाठी साद सोशल फाउंडेशन अधिक संवेदनाक्षम कार्य करीत आहे. जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करीत काम केले जाते, तेव्हा ते उल्लेखनीय होतेच. तिमिरातुन तेजाकडे नेणारी ही दिपावली दिव्यांग बांधवांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करो, करत दिवाळीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
”गेल्या ९ वर्षांपासून अंध बांधवांसोबत साद सोशल फाउंडेशन दिवाळी उत्सव साजरा करते. या सामाजिक उपक्रमाला आज सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आनंदाने सहभागी होतात. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी आम्हाला ते देतात. समाजातील विविध स्तरातील गरजूंना केलेली मदत हे ख-या अर्थाने समाजऋण फेडण्याचे कार्य आहे, असेही इरफान सय्यद यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक साद सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे यांनी करून फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेश व्हनवटे, अरुण जोगदंड, सुनील सावळे, निलेश देसाई, शहीद शेख, राहुल कोल्हटकर, उज्वला गर्जे, आयुष शिंदे, चंदन वाघमारे, प्रशांत व्हीटकेल, महेश हुलावळे, रत्नाकर भोजने, अमित पासलकर, बबन काळे, मंगेश थोरात, श्रीकांत सुतार, समर्थ नाईकवाडे, गणेश नाईकवाडे चंद्रकांत पिंगट यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी तर, प्रवीण जाधव यांनी आभार मानले.