पिंपरी (Pclive7.com):- गुंगीचे औषध देवुन चोरी करण्याऱ्या नोकरासह इतर तिघांना अटक करून ४ वाहने व सोन्याचे दागिणे असा ८ लाख ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ ला यश आले आहे.
रफिक उमर जमादार (वय ३७ वर्षे, रा. तुपेवस्ती, टोल नाक्या जवळ, मोशी) हा चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिणे विक्रीकरीता राम मैदान, जाधववाडी, चिखली येथे थांबला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत एका प्लॅस्टीकच्या पिशवीत एक सोन्याचे ब्रेसलेट, एक गळयातील सोन्याचे चैन गणपतीचे पॅडल असा एकुण ५ लाख ३१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तो उघडकीस करण्यात आला आहे.
दुचाकी गाडी ही चोरीची असून आरोपी रफिकने त्याचे साथीदार १) निलेश मनोहर गायकवाड २) ईश्वर संजय पवार यांच्यासह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन दुचाकी वाहने चोरी केली असल्याचे उघड झाले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून दुचाकी वाहने मेस्ट्रो, रॉयल इनफिल्ड, हिरो स्प्लेंडर, हिरोहोंडा पेंशन प्रो अशी ०४ दुचाकी वाहने असा ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.
आरोपी रफिक विरुध्द पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीचे एकुण ०७ गुन्हे नोंद असुन निलेशविरुध्द पिंपरी चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण हद्दीत वाहन चोरी, घरफोडी, जबरीचोरी, दरोडयाची तयारी असे एकुण ३४ गुन्हे नोंद आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार मनोजकुमार कमले, महादेव जावळे, गणेश महाडीक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, श्रीधन इचके, प्रमोद गर्जे, तुषार वराडे, अजित रुपनवर, तानाजी पानसरे यांनी केली आहे.