पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथील वनविभागाच्या जागेत एका तरुणाचा अज्ञातांनी खुन केला होता. कोणतेही पुरावा नसताना २४ तासांच्या आत या खुनाचा गुन्हा उघड करुन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट १ ला यश मिळाले आहे. याप्रकरणी सुरज हणुमंत इंगळे (वय २९ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली), मेहुल कैलास गायकवाड (वय २८ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली), अजय अशोक कांबळे (वय २४ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी अजय अशोक कांबळे याच्यावर चिखली, पिंपरी, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संदिप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.०२ फेब्रुवारी रोजी पाटीलनगर, चिखली पुणे येथील वनविभागाच्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने तसेच धारदार हत्याराने मारहाण व वार करुन खुन झाला होता. हा खुन करुन आरोपी हे कोणताही पुरावा न ठेवता फरार झाले होते. सदर खुनाचा तपास चिखली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मार्फत आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके तयार करुन सुमारे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन आरोपी सुरज हणुमंत इंगळे, मेहुल कैलास गायकवाड, अजय अशोक कांबळे यांना ताब्यात घेऊन त्यांनीच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी त्या तरूणाला मारहाण करुन त्याच्याजवळील पैसे दारु पिण्यासाठी काढुन घेण्याकरिता खुन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर मयत हा भैय्या गमन राठोड (वय-३३ वर्षे, राह इंदिरा गार्डनजवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे, मुळगाव-मु. सोनगाव, पो. केरडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत इसम हा सुमारे ३ महिन्यापुर्वी पिंपरी चिंचवड शहरात कामाधंद्यासाठी त्याच्या कुटुंबासह आला होता.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार महादेव जावळे, सोमनाथ बो-हाडे, मनोजकुमार कमले, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, श्रीधन इचके, अजित रुपनवर, तुषार वराडे, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले. तानाजी पानसरे यांनी केली आहे.