आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये होळी या सणाला एक पारंपारिक वारसा लाभला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व वारकरी बांधव प्राचीन काळापासून परंपरेप्रमाणे एकत्रित येऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात होळी सण साजरा करतात.

संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते होळीची विधीवत पूजा अर्चा करून पुरणपोळीचा नैवेद्य देऊन नारळ वाहिला गेला. विशेष म्हणजे या होळीत लाकूड फाटा न जाळता शेणाच्या गोऱ्याच पेटवून होळी सण साजरा केला जातो. होळी सणासाठी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मोठ्या भाविक उपस्थित होते.
Tags: आळंदीसंत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पारंपारिक पद्धतीने होळी सण साजराहोळी सण साजरा