पिंपरी (Pclive7.com):- कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळावा. यासाठी शिवसेनेच्यावतीने पिंपरी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये युवतींकडून आरोपींना प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. वैष्णवीच्या मारेकर यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान वैष्णवीला न्याय मिळवा यासाठी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.23) वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळावा तसेच तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपनेते सुलभा उबाळे यांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये युवतींचा सहभाग उल्लेखनीय होता.
आंदोलनामध्ये पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, उपजिल्हाप्रमुख युवा सेना राजेंद्र तरस, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहर प्रमुख ॲड मुकुंद ओव्हाळ, भोसरी शहर प्रमुख अजिंक्य उबाळे, सुहास तळेकर, शुभम महाडिक, युती सेना उपजिल्हाप्रमुख सायली साळवी, उपशहर प्रमुख अंकुश कोळेकर, महिला विभाग प्रमुख सुवर्णा कुटे, चिंचवड विभाग प्रमुख संतोष बारणे, उपशहर प्रमुख शशिकला उभे संघटक सुदर्शन देसले, उपशहर प्रमुख महेश कलाल, उपशहर प्रमुख दिलीप कुसाळकर, उद्योग सेनेचे कार्तिक गोवर्धन, युवा सेना जिल्हा समन्वयक सागर उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, विभाग प्रमुख आकाश बारणे, पिंपरी चिंचवड सभाप्रमुख निखिल देवले, सुबोध श्रीवास्तव, याशिवाय मोनिका उबाळे, सुलोचना महाकाळ प्राची पाटील, नयना पारखे, ममता कदम, दीपा जखाते, शिल्पा भोंडवे, भारती चकवे, संगीता तुपके, कावेरी परदेशी, सागर शिंदे ,अमित शिंदे तसेच युवा सेना,महिला आघाडी पदाधिकारी
यांनी सहभाग घेतला.
यावेळी युवतींनी परखडपणे विवाह संस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले. समाजात अजूनही हुंडा बळी जात असतील तर पुरोगामी महाराष्ट्राला हे लांछनास्पद आहे असे देखील मग यावेळी व्यक्त करण्यात आले
यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, विवाह संस्था भारतीय संस्कृतीतील आदर्श उदाहरण आहे. मात्र काही घटनांमुळे या विवाह संस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. समाजात अशा घटना वाढत असतील तर विचार करण्याची गरज आहे. विवाह संस्थेबद्दल युवतींची मानसिकता प्रचंड निराशा जनक होत आहे. याच्यावर उपाय करणे अशा मानसिकतेला व प्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे.