
राजेंद्र हगवणेचा 17 मे ते आज पहाटेपर्यंतचा प्रवास-
17 मे-
– औंध हॉस्पिटल
– मुहूर्त लॉन्स (थार गाडीने)
– वडगाव मावळ
– पवना डॅम (फार्म हाऊस)
– आळंदी येथे लॉजवर
18 मे –
– वडगाव मावळ
– पवना डॅम (बंडू फाटक कडे बलेनो गाडीने)
19 मे-
– पुसेगाव (सातारा) अमोल जाधव यांच्या शेतावर
19 मे आणि 20 मे-
पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज)
21 मे-
कोगनोळी (प्रीतम पाटील या मित्र्याच्या शेतावर)
22 मे-
पुण्याला परत
वैष्णवीच्या आत्महत्येनंर महाराष्ट्र हादरला..
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.