पिंपरी (Pclive7.com):- हिडन मोबाईल अॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या भोंदुबाबाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय २९) असं या भोंदू बाबाचे नाव आहे. याने दिव्यशक्ती असल्याचा दावा करत अनेकांची फसवणूक केली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दिव्य शक्तीची आत्मभुती प्राप्त आहे. पुर्व इतिहास सांगत विश्वास संपादन करुन घेतला. त्यानंतर अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. भोंदू बाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे.
तसेच, या भोंदू बाबाने अर्थिक फसवणून केल्याचेही फिर्यादीत सांगण्यात आले आहे. मठाला मदत करण्याच्या बहाण्याने माझ्याकडून १५ हजार रुपये घेऊन माझी आणि इतरांची फसवणुक केली असून या भोंदूबाबाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
पोलिसांची भोंदुबाबाला अटक
फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांची या भोंदू बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी तामदार याला अटक केली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अॅपची कसून चौकशी करण्यात आली आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच, बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.