मावळ (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, मावळचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी म्हणून ओळखले जाणारे कृष्णराव धोंडिबा भेगडे (वय ८९) यांचे आज सोमवारी (दि.३० जून) रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्याने एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे नेते गमावले आहेत.

कृष्णराव भेगडे यांच्यामागे कन्या राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के व नातवंडे असा परिवार आहे. कृष्णराव भेगडे यांची अंत्ययात्रा मंगळवार, १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तळेगाव दाभाडे येथील लेक पॅराडाईज येथील राहत्या घरापासून सुरू होईल. अंत्यसंस्कार तळेगावच्या बनेश्वर स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.























Join Our Whatsapp Group