वडगाव मावळ (Pclive7.com):- बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी अधिक चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला.

या कालावधीत पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी करण्यात येणार असून, हत्येचा नेमका कट, त्यामागील कारणे तसेच इतर संबंधित बाबींचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तपासातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group