पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड लिंक रोड येथील टाइल्सच्या दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला करत तीन लाख 80 हजार रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. काही तासातच टिप देणारा कामगार आणि हल्ला करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने आवळल्या आहेत.

याप्रकरणी यश रमेश अंधारे (वय १८ वर्षे, रा. बोऱ्हाडे बिल्डीग, चांदणी चौक, थेरगाव गावठाण), रितेश मुकेश चव्हाण (वय १८ वर्षे, रा. जगताप नगर नं. ४ व ५. थेरगाव), रुपेद्र रुपबसंत बैद (वय १९ वर्षे, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) व विधी संघषीत बालक यांना थेरगाव स्मशानभुमी येथून ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.०२) रोजी रात्री ०९.५० वाजण्याच्या सुमारास दिपक नरसाना यांचे श्रीजी सिरामिक दुकान, केशवनगर, चिंचवड येथे आशिष अरजनभा बुवा हे थांबलेले असताना चार जणांच्या टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन जखमी केले होते. तसेच त्यांच्या ताब्यातील ३ लाख ८० हजार रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या उद्या टोळक्याने हातातील धारदार हत्याराने दहशत माजवून तेथे दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर गुंडा स्कॉडच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि खबराच्या माहितीने या टोळक्याला थेरगाव येथील स्मशानभूमी जवळ अटक केली आहे.

दहशत निर्माण केलेल्या ठिकाणी आरोपींची धिंड..
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंडा स्कॉड च्या पथकाने काही तासातच या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चिंचवड गावातील ज्या केशवनगर भागात आरोपींनी या व्यापाऱ्यावर हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या आरोपींची धिंड काढून समाजातून या परिसरात आरोपींनी निर्माण केलेली दहशत मोडीस काढली आहे.
सदरची कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, प्रविणकुमार तापकीर, सहायक पोलीस फौजदार ठोकळ, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, पोलीस हवालदार गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, विजय तेलेवार, शाम बाबा, नितीन गैंगजे, पोलीस शिपाई रामदास मोहीते, विजय वेळापुरे, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group