पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अतिरिक्त आयुक्तपदी नव्याने विक्रांत बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी -१ प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. साधारण महिनाभरापासून हे पदर रिक्त होते. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी नियुक्तीचा आदेश दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. यामध्ये एक आणि दोन प्रतिनियुक्तीने आणि तीन हे स्थानिक अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीने अशी विभागणी केली आहे. राज्याच्या वित्त व नियोजन विभागातील प्रदीप जांभळे-पाटील यांची महापालिकेतील प्रतिनियुक्ती ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. त्यांची सेवा मूळ वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली.

तथापि, महापालिका निवडणूक कामकाजामुळे जांभळे-पाटील यांना १५ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले. तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. सद्यस्थितीत अतिरिक्त आयुक्त म्हणून मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर कार्यरत आहेत. त्याच वेळी विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे.

यापूर्वी महसूल संर्वगातील सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. महसूल व वन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले होते. मात्र, नगर विकास विभागाचा आदेश न मिळाल्याने रुजू करून घेण्यास प्रशासकीय अडसर होता. परंतु, त्याचे नाव आता पुन्हा मागे पडले आहे.
























Join Our Whatsapp Group