मुंबई (Pclive7.com):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महापालिका निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज सोमवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ही पत्रकार परिषद मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सद्यस्थिती, तयारी, संभाव्य वेळापत्रक तसेच आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण संकेत या पत्रकार परिषदेत दिले जाण्याची शक्यता आहे.

























Join Our Whatsapp Group