पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजना आराखड्यावर (डीपी प्लान) तब्बल 56 हजार 771 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यावर आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात सोमवार (दि.३) पासून सकाळी साडे दहा ते ते सायंकाळी सव्वा सहा या वेळेत सुनावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी भागातील हरकती व सूचनावर सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणी पाच महिने चालणार आहे.

महापालिकेकडून सुधारित प्रारुप विकास योजना आराखडा 15 मे 2025 ला प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर 14 जुलै 2025 पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आला. त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. 56 हजार 779 जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास पालिका सर्वसाधारण सभेने 15 मे 2026 ला मान्यता दिली आहे. सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात पिंपरी भागातील 12 हजार 300 हरकती दाखल झाल्या आहेत. त्या नागरिकांची सुनावणी 3 ते 14 ऑगस्ट कालावधीत घेतली जाणार आहे. नोटीस मिळालेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक हरकतदाराला म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. नाट्यगृहात मोठा स्क्रीन लावण्यात आला आहे. डीपी प्लान, डीपीची गुगल इमेज, जुना डीपी प्लान लावण्यात आला आहे. सुनावणीपूर्वी हरकत नोंदवलेल्या नागरिकांना टपालाने नोटीस पाठवून सुनावणीचे ठिकाण, वेळ व दिनांक कळवण्यात येतो. सुनावणीच्या वेळी हरकतदारांच्या उपस्थितीच्या नोंदी घेण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम बाकी आहे. सुनावणीसाठी ग. दि. माडगुळकर नाट्यगृह 1 जुलै ते 31 डिसेंबर आरक्षित करण्यात आले आहे. त्या काळात नाट्यगृह कोणालाही नाट्यगृह भाड्याने दिले जाणार नाही.

सात सदस्यीय समितीमार्फत सुनावणी..
सुनावणी समितीमध्ये नगर रचना विभागाचे निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, निवृत्त उपसंचालक दत्तात्रय पवार, निवृत्त उपसंचालक उत्तरेश्वर लोंढे, पर्यावरण अभियंता नरसू शिंदे या चार तज्ज्ञांचा समावेश आहे. त्या समितीमध्ये स्थायीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, समिती सदस्य संदीप कस्पटे व सारिका गायकवाड यांची सदस्य म्हणून नियुक्तीस सर्वसाधारण सभेने 15 मे रोजी मंजुरी दिली आहे. यि समितीमार्फत सुनावणी घेतली जाणार आहे.




















Join Our Whatsapp Group