पिंपरी (Pclive7.com):- पैशांच्या वादातून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही शनिवारी (दि.१) सकाळी साडेनऊच्या सुमारास इंद्रायणीनगर क्रीडा संकुल मैदान, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात दीपाली संदीप डोळस (३३, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल सुभाष लांडे (४१, रा. भोसरी), बापू साहेबराव अहिवळे (४५, रा. भोसरी) आणि राजन जयचंद जिनवाल (४८, रा. सांगोडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादीचे पती संदीप डोळस यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर “याला जिवंत सोडायचे नाही,” असे म्हणत तिघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत संदीप यांच्या पोटात रक्तस्त्राव झाला असून कंबरेखाली गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी राजन जिनवाल याला ताब्यात घेतले आहे.




















Join Our Whatsapp Group