नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आघाडी; मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद
भोसरी (Pclive7.com):- चिखली, कृष्णानगर परिसरात सुरू असलेल्या प्रचारातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात भाजपच्या सक्रिय सदस्य आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष निशा दिनेश यादव यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीपासूनच विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्याने प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून, आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी मैदानात उतरण्याचा दृढ संकल्प निशा दिनेश यादव यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांपर्यंत पोहोचण्यात मिळालेली आघाडी महत्त्वाची..
रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत प्रचाराच्या माध्यमातून प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रचाराच्या केवळ चौथ्या दिवसातच नागरिकांमध्ये पोहोचण्यात मिळालेली आघाडी ही आगामी काळासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

पती दिनेश यादव यांनी भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वी केलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याची पोचपावती या प्रचारादरम्यान मिळताना दिसत आहे. नागरिकांनी दाखवलेले प्रेम आणि दिलेले आशीर्वाद यामुळे मन भारावून गेले आहे. लवकरच घराघरांत जाऊन प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधण्याचा मानस असून, विकासाचा अजेंडा घेऊनच नागरिकांसमोर जात राहणार आहे.– निशा दिनेश यादवअध्यक्ष इंद्रायणी महिला प्रतिष्ठान.























Join Our Whatsapp Group