पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पवना धरणात आज ७५.१७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरणातील या पाणीसाठ्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या वर्षभराचा शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पिंपरी चिंचवड, लोणावळा शहर परिसर आणि धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून पवना धरणात आज ७५.१७ टक्के पाणीसाठा जमा झाल्याची नोंद आहे. गेल्या २४ तासात धरण क्षेत्रात २२३ मि.मि. पाऊस झाला आहे. १ जूनपासून १७७९ मि.मि. पाऊस झाालेला आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १५५२ मि.मि एवढा पाऊस झालेला.






















Join Our Whatsapp Group