पिंपरी (Pclive7.com):- महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष भेट, सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांचा वापर करत उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

प्रभाग क्र.१५ ‘अ’ मधून समीर दिलीप जावळकर तर प्रभाग क्र. १५ ‘ड’ मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने चेतन गौतम बेंद्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्वतः सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणारे युवा उमेदवार देशाच्या लोकशाहीसाठी लढत असल्याचे चित्र दिलासादायक आहे, असा सूर नागरिकांतून उमटत आहे. त्यांच्या होम टू होम प्रचाराला भरभरून प्रतिसाद मिळत असून या प्रभागात शिवसेना पक्ष बाजी मारेल, असा अंदाज वर्तवला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडकी बहीण योजना तसेच कामातील तत्परता यामुळे नागरिकांची विशेष पसंती असून त्यांचे उमेदवार असणारे चेतन बेंद्रे आणि समीर जावळकर हेही आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत आले आहेत.






















Join Our Whatsapp Group