पिंपरी (Pclive7.com):- दापोडी परिसरात होत असलेल्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ (काल दि.५ रोजी) राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नागरिकांसमवेत रास्तारोको केला होता. याप्रकरणी बेकायदेशीररित्या जमाव जमवून मुंबई-पुणे महामार्ग आढवत आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटेसह यांच्यासह एकूण ३७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विस्कळीत पाणी पुरवठा सुरु आहे. येथील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे यांच्यासह एकूण ३७ जणांनी बुधवारी दुपारी दापोडी येथील मुंबई-पुणे महामार्ग आडवत धरणे आंदोलन केले होते. यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यादरम्यान शहर परिसरात प्रतिबंधनात्मक आदेश जारी करण्यात आला होता. या आदेशाचे उल्लंगन केल्याने पोलिसांनी नगरसवेक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे त्यांच्यासह एकूण ३७ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करत आहेत.