पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा तसेच बालमेळाव्याचे आयोजन दापोडी-कासारवाडी प्रभागात करण्यात आले आहे.
नगरसेवक रोहित काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लॉन टेनिस हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कासारवाडी येथील महिला आयटीआय शेजारील महापालिकेचे मैदानात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आज शुक्रवारी दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
शनिवार दि.२२ रोजी सकाळी ९.३० वाजता दापोडी येथील त्रिरत्न सांस्कृतिक केंद्र येथे महाराष्ट्र राज्य कराटे-किक बॉक्सिंंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑल इंडिया शिटो – रियो कराटे – दो अँकेडमी यांनी या स्पर्धेचे संजोजन केले आहे.
शनिवार दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजता शितळा देवी चौक, सिध्दी टॉवर कॉर्नर दापोडी येथे ऑटो रिक्षा सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दापोडी येथील छत्रपती रिक्षा स्टँड व नरवीर तानाजी रिक्षा स्टँडच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शनिवार दि. २२ रोजी सायंकाळी सात वाजता ११ नंबर बस स्टॉप कुस्ती मैदान दापोडी येथे भव्य बालमेळाव्याचे आयोजन नगरसेवक रोहित काटे मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.