पिंपरी (Pclive7.com):- पंजाब राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व सरकारी रूग्णालयात रुग्णांसाठी मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य व शिवसेना तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नववर्षास राज्यातील जनतेला सुखद धक्का दिला असून, (१ जानेवारी) रोजी ‘तंदुरूस्त पंजाब’ या योजने अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मोफत रक्त पुरवठा सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘तंदुरूस्त महाराष्ट्र’ ही योजना राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात राबवावी व राज्यातील रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.