पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्र.५१ येथे पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या हस्ते औक्षण करून करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती निर्मला कुटे या देखील उपस्थित होत्या.
पिंपरी चिंचवड महापाविकेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तसेच पुस्तकांचे वाटप नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. वेगळ्या पद्धतीने स्वागत होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गेगजे (जोशी) तसेच प्राथमिक व बालवाडीचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group