पिंपरी (Pclive7.com):- उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच तुम्हाला पुढची पाच वर्ष मनासारखी हवी असतील तर मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवा असे आवाहन मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने युवा वर्गाला केले. आज निगडी प्राधिकरण येथील मतदान केंद्रावर तिने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ती प्रसारमाध्यमांशी बोलत होती.

सोनाली म्हणाली की, सोशल मीडियावर तुम्ही मत मांडायला तत्पर असता, मात्र मतदान करायला का मागे राहता. ह्या वेळेला ही मतदानाची टक्केवारी आपण वाढवूयात, अजूनही वेळ आहे. प्रत्येकाला मी विनंती करेल कि सर्वांनी घरातून बाहेर पडा, मतदान करा. आज पावसाळी वातावरण जरी असलं तरी मतदानाचा हक्क जरूर बजावा. युवा पिढीला मी सर्वात जास्त आवाहन करेल की मतदान करा. आता इथे पाहिलं तर लक्षात येतं की अनेक ज्येष्ठ नागरिक मतदाना करिता आले आहेत. मात्र युवा वर्गांची संख्या कमी दिसत आहे. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी युवावर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. पुढची पाच वर्षे तुम्हाला कशी हवीत? तुमच्या मनाप्रमाणे जर हवे असतील तर तुम्ही जरूर मतदान करा असे आवाहन तिने यावेळी केले.






















Join Our Whatsapp Group