पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवासाठी परिसरातील नागरिकांनी आपल्या घरून पणत्या आणल्या होत्या. एक हजार एक दिवे यावेळी लावण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलित करण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसर उजळून दिसत होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
त्रिपुरारी पौर्णिमा हा दिव्याचा सण आहे. या दिवशी दिवे लावणाने एक चैतन्य निर्माण होते. तसेच आपल्याला विशेष पुण्य मिळते, अशी भाविकांची भावना आहे. या दीपोत्सवासाठी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा.हरिनारायण शेळके, मंगेश पाटील, शेखर पाडळकर, कैलास मुळे, शरद पवार, अर्चना तोंडकर, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, शोभा नलगे, प्रिया गायकवाड, नेहा अहिरे, यांनी परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group