पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) आरक्षण राखीव झाला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने आज (बुधवारी) मुंबईत राज्यातील महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून ७७ पैकी तब्बल २१ सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडूण आलेल्या नगरसेविका आहेत. त्यामुळे महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता उलथून पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपाचा पहिला महापौर होण्याचा मान भोसरीला गेला. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे हे भाजपाचे पहिले महापौर ठरले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महापौरपदाची वर्णी आमदार लांडगे समर्थकाकडे गेली. काळजे यांच्यानंतर राहुल जाधव यांना महापौर पदाची संधी मिळाली. त्यांचा कार्यकाळ येत्या २० नोव्हेंबरला संपत आहे. आता सर्वसाधारण महिला (खुला प्रवर्ग) महापौरपदासाठी राखीव झालायं. राजकीय वाटाघाटींचा विचार करता पुढचा महापौर हा चिंचवडला म्हणजेच आमदार लक्ष्मण जगताप गटाकडे जाणार असे चित्र आहे.
भाजपाच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडूण आलेल्या नगरसेविका खालील प्रमाणे..
सारिका सस्ते
निर्मला गायकवाड
प्रियांका बारसे
सोनाली गव्हाणे
भिमाबाई फुगे
शैलजा मोरे
शर्मिला बाबर
संगीता भोंडवे
माधुरी कुलकर्णी
करुणा चिंचवडे
कोमल मेवानी
सुजाता पालांडे
माया बारणे
आरती चोंधे
सुनिता तापकीर
निर्मला कुटे
चंदा लोखंडे
सीमा चौगुले
माई ढोरे
साधना मळेकर
नीता पाडाळे
आता यापैकी महापौरपदी कोणाची वर्णी लागणार की अन्य प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला नगरसेविकेची लॉटरी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. परंतू तुर्तासतरी नवीन महिला महापौर कोण होणार याचीच उत्सुकता वाढली आहे.






















Join Our Whatsapp Group