पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. यात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर अवघ्या देशात सर्व धर्मांच्या सार्वजनिक प्रार्थना स्थळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मागे नागरिकांनी एकत्र जमू नये हा हेतू आहे. मात्र असे असूनही पिंपरी चिंचवड शहरात मात्र शासन निर्णयाकडे सर्रास दुर्लक्ष करत ४० ते ५० जणांनी एकत्र येऊन एका बिल्डींगच्या टेरेसवर नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे गर्दी करू नका असे आवाहन पोलीस प्रशासन करत असून दुसरीकडे मात्र काहीजण पोलिसांना दाद देत नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष बिभीषण सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे.
कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, असे जरी असले तरी दुसरीकडे काही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे करोनाला नियंत्रणात आणणे कठीण होत आहे. एकीकडे देशभरासह महाराष्ट्रात मंदिरे, प्रार्थनास्थळ नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली असताना, दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात काही जणांनी एकत्र येत एका बिल्डींगच्या टेरेसवर सामूहीक नमाज पठण केले. यावेळी ४० ते ५० जणांची उपस्थिती असल्याचे एका फोटोद्वारे समोर आल्यानंतर चिखली पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. एकुण १३ जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींवर कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदासह इतर कलम लावण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेले कोरोना विषाणूचे थैमान थांबवायचे असेल तर गर्दी न करणं महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.






















Join Our Whatsapp Group