पुणे (Pclive7.com):- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून पुण्यात कोरोना विषाणूने पहिला बळी घेतला आहे. ५२ वर्षीय रूणाचा उपचारा दरम्यान खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे ९ जणांचा बळी गेला असून देशातील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ३० वर पोहचली आहे.
पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.






















Join Our Whatsapp Group