पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी घरा बाहेर पडून नये असे आदेश प्रशासनाने दिलेत. तरी देखील मोठ्या संख्येने घरा बाहेर आल्याचे दिसत आहे. पिंपरीत ‘सोशल डिस्टंसिंग’ला नागरिकांकडून हरताळ फासल्याचे दिसत आहे. किराणा साहित्य खरेदीसाठी दुकानांसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहातील पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा तब्बब ३० वर पोहचला आहे. नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आदेश दिलेत. शहरातील अनेक भाग सील करण्यात आलेत. तसेच पोलीसांनी अनेक रस्ते बंद देखील केले आहेत. तरी देखील या संकटकाळी नागरिकांना कसलेही गांभिर्य नसल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कृपया गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे. सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा. पोलीसांना सहकार्य करावे. अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group