भोसरी (Pclive7.com):- कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे, मी जो आज आहे तो केवळ कार्यकर्त्यांमुळेच अशी घोषणा करणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील १२८ जणांचे कोरोना अहवाल आज बुधवारी (दि.१) निगेटीव्ह आले आहेत. सुदैवाने कार्यकर्त्यांना जपणाऱ्या महेश लांडगे यांच्या गेल्या आठवड्यात संपर्कात असलेल्या एकाही कार्यकर्त्यांला कोरोनाची बाधा झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नियतीने महेश लांडगे आपल्या कार्यकर्त्यांचे किती काळजी घेतात हे सिध्द केले आहे.
आमदार महेश लांडगे ‘ Get Well Soon ‘ अशा पोस्ट कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्या आहेत. दादांच्या कोरोना पॉझिटीव्ह अहवालाने भोसरी मतदार संघातीन अनेकांना वाईट वाटते आहे. अनेकांच्या घरात देवासमोर ‘दादांना लवकर बरे कर देवा’ म्हणून प्रार्थनाही केल्या जात आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या १२८ कार्य़कर्त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने दादांचेही टेन्शंन कमी झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार महेश लांडगे यांची शुक्रवारी बैठक पार पडली होती. आयुक्त हर्डीकर हे आमदार लांडगे यांच्या संपर्कात आले होते. तसेच आयुक्तांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे आयुक्तांनीही स्वतःस होम क्वारंटाइन करून घेतले आहे. महत्त्वपूर्ण बैठका तसेच निर्णय हे व्हीसीद्वारे केल्या जात आहेत.
‘त्या’ १२८ जणांना दिलासा..!
आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. अनेकांनी आपल्या अहवाल व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सवर अपडेट केले आहेत.