शिवसेना निगडी शाखाप्रमुख अरूण जोगदंड यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- निगडी शिवसेना शाखाप्रमुख अरुण जोगदंड यांनी नुकतीच आयुक्त व महापौर यांची भेट घेत सेक्टर २२ येथील वंचित लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेत मोफत घरे देण्याची आग्रही मागणी केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांनी आयुक्त व महापौर यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जे.एन.यु.आर.एम अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन गृहप्रकल्प राबविण्यात आला होता.
सदर गृहप्रकल्पात एकुण १४७ इमारतीमध्ये ११७६० सदनिकेचा प्रस्ताव होता. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेवरून जुन्या इमारती पाडून तेथील नागरीकांना नवीन घराचे स्वप्न दाखवत हा प्रकल्प उभा करण्यास सुरवात केली.
परंतु प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे रेड झोनच्या हद्दीची माहीती न घेता राहत्या घरातून बेघर करत लोकांना आज खुरावड्यात राहण्यास भाग पाडले. यातील काही इमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन देखील अद्यापही काही लाभार्थांना घरापासून वंचित राहावे लागत आहे.
या मध्ये सामान्य नागरीकांची कोणतीही चुक नसताना आज त्यांना असहय्य त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील लाभार्थी प्रशासनाला अत्यंत संयमाने सहकार्य करत आहेत. परंतु आता नागरीकांचा संयम सुटला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या प्रकल्पात सदनीका वाटप करणे न्यायालयीन आदेशामुळे शक्य नसेल तर महानगरपालिकेने पंतप्रधान योजने अंतर्गत या नागरीकांना विनाशर्त मोफत घर देण्यात यावे ही नम्र विनंती. तरी याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेवर तीव्र जनआंदोलन करण्यात येइल, असे पत्रात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group