पिंपरी (Pclive7.com):- वडार समाजासाठी व तृतीयपंथीयांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी घोषित केलेले महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय लहुजी पँथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दाखले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील प्रत्येक शहरात तसेच ग्रामीण भागात वंचित राहीलेल्या वडार समाजाच्या बांधवांसाठी व तृतीयपंथीच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या विकासाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष राहिलेले आहे. प्रामुख्याने वडार समाज बांधव या मागण्यासाठी आंदोलन करित होता.
तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारने राज्यभर झालेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन वडार समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक विकास महामंडळ घोषीत करण्यात आले आहे. परंतु हे महामंडळ अद्याप कार्यान्वित झालेले नाही. ते तात्काळ कार्यरत करावे ही भारतीय लहुजी पँथर या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत.
वडार समाज बांधवांना प्रत्येक कुटूंबाला ५ लाख रूपयांचे कर्ज देण्यात यावे. तसेच वडार समाजाचे जात दाखले आणि पडताळणीमध्ये पारदर्शकता आणावी व जाचक अटी रद्द करण्यात यावी अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group